मराठा आरक्षणाबदल मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाने लवकरात-लकवर मराठा आरक्षणाचा अहवाल शासनाला सादर करावा अशी विनती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधानसभेच विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यभरात आठवड्याभरापासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तसेच लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशी आग्रही मागणी होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साधक-बाधक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, आंदोलनावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यावरील केसेस मागे घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण गाड्यांची तोडफोड करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

सिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती?

 Loading…
Loading...