स्त्री शक्तीने विश्व व्यापले…

blank

व्यासपीठ 

स्त्री शक्तीने विश्व व्यापले
मग तिच्याच जन्माने का अश्रू दाटले?
तिच्या अस्तित्वाचे ओझे वाटले
मुलगी नको सांगायला देऊळ गाठले।
जन्माला येण्याआधीच परीक्षा सुरु होते
स्रीच्याच मनाला का नेहमी दुःखाचे कुरूप होते?
भावाचा हात
तिच्या राखीविना सुना
नाती कळणार नाहीत
तिच्याइतकी कुणा।
सुख आणि दुःख
अनुभवते सारे
डगमगत नाही
जरी वाहिले वादळी वारे
वाकड्या नजरा जगाच्या
वासना वाईट मनाच्या
सांभाळून हे सारं
पेलवते जीवनाचा भारं
सासरचे आणि माहेरचे
जपते ती घर
येणार नाही तिला
कशाचीच सर
काम आहे हाती
पण जपते सारी नाती
तरी तिच्याच जीवाची
का होते माती?
विक्रम करीत मोठमोठे
घेतले विश्व हाती
तरी अजुनी बापाची
गर्वाने फुगत नाही छाती
घात करुनी या जीवाचा
पाप नको करूस तू
माणसा रे माणसा
माणसात ये रे तू …..

कवयित्री – निलिमा दहिफळे , अहमदनगर