आला उन्हाळा तब्बेत सांभाळा !

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या झळा जाणवायला लागतात.वाढत्या तापमानामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते.उन्हाळ्यात शरीराला आवशकता असते थंड पेयाची. बाजारात अनेक प्रकारची थंड पेय उपलब्ध असतात परंतु त्यामुळे आपली तहान तर भागवली जाते परंतु शरीराचे तापमान कमी ठेवण्यात मदत होत नाही. दही शेक हे त्यापैकीच एक उत्तम थंड पेय आहे .

घरच्या घरी असे बनवा उन्हाळ्यातील पेय : दही शेक

दहीमध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून चांगल्या पद्धतीने घोटून घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या.या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.

उन्हाळ्यात दही शेक सेवनाचे फायदे :

– घरी बनवलेल्या थंडगार दही शेक ने  संपूर्ण दिवसभर आपली प्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

Loading...

– दही शेक हे शरीराला थंड बनून पोषणही देते. यातून मिळणारे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.

– त्वचा देखील सुंदर तजेलदार होण्यास मदत होते.

Loading...

– यामुळे आपले शरीर लू आणि डिहाइड्रेशन यासारख्या समस्यांना प्रतिकार करायला तयार होते.

Loading...