दिवाळी स्पेशल – बहिण- भावाच्या नात्यांचा उत्सव भाऊबीज

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. जर काही कारणाने बहिणीच्या घरी भाऊ जाऊ शकला नाही अथवा तिला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. इथे मला नागपंचमीची आठवण होते. आपल्या संस्कृत बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमीचा उपवास करते. हिंदू संस्कृतीत नागाला भाऊ मानलं गेलं आहे. चंद्र व नाग दोन्ही शेतीसाठी उपयुक्त आहेत. भाऊबीज साजरी करण्यामागे शेती संस्कृतीत हाच उद्देश आहे. शेतीसाठी उपकारक असणाऱ्या चंद्राचे औक्षण बहीणरूपी धरती करते हा अर्थ भाऊबीजेचा आहे

You might also like
Comments
Loading...