Share

Sanjay Raut । संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?; जामीन अर्जावर आज महत्वाची सुनावणी

Sanjay Raut । मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट  निर्णय देणार आहे.

त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून राऊत यांना दिलासा मिळेल की पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राऊत यांचे अॅड. अशोक मुंदरंगी यांचा या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

मुंदरंगी यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंह हे आज युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे सिंह कोणते मुद्दे मांडतात आणि मुंदरंगी यांचे मुद्दे कसे खोडून काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut । मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now