मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा आरक्षण, राजकारणातील ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, धनगर आरक्षण यावरून राज्यात आंदोलने सुरु असतानाच आता मुस्लिम समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. समाजासाठी ५ टक्के आरक्षण त्वरित लागू करण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीने थेट विधानभवनावर मोर्चाची हाक दिली आहे.
तर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला ५ जुलै पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. सरकारला विधानभवनावर धडकणारा मोर्चा थांबवायचा असेल तर मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, अन्यथा ५ जुलै रोजी होणारा हा मोर्चा अटळ असल्याचा इशारा देखील आंबेडकरांनी दिला आहे.
धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणाऱ्यां विरुद्ध कायदा व ५% मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी ५ जुलै रोजी आमचा मोर्चा विधानभवनावर धडकेल. आमचा निर्धार पक्का आहे. सरकारला वाटत असेल मोर्चा निघू नये तर त्यांनी आमच्या ह्या रास्त मागण्या मान्य कराव्या.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 30, 2021
‘मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम समाजाला ५% आरक्षण मंजूर झाले होते. मराठा आरक्षणाबरोबर त्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले, परंतु न्यायालयांनी मुस्लिम आरक्षण मान्य केले आहे. असे असूनही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाला वंचित ठेवले ही शरमेची बाब आहे. धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणाऱ्यां विरुद्ध कायदा व ५% मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी ५ जुलै रोजी आमचा मोर्चा विधानभवनावर धडकेल. आमचा निर्धार पक्का आहे. सरकारला वाटत असेल मोर्चा निघू नये तर त्यांनी आमच्या ह्या रास्त मागण्या मान्य कराव्या,’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीत मोठे वाद आणि संशय; शिवसेनेनं भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे’
- ‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामे करता का?’, हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले
- ‘अजित पवार तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही; २०२४ च्या पराभवाआधीच तुम्ही जेलमध्ये असाल’
- राजस्थान भाजपमधील अंतर्गत वादाचा कॉंग्रेसला होतोय चांगलाच फायदा
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<