राज्यात यंदा समाधानकारक पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले अंदाज पत्रक जाहीर

Monsoon_Rain

मुंबई : राज्य कोरोनाच्या संकटात असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 96 ते 100 टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.या वृत्तामुळे राज्यातील शेतकरी हा नक्कीच सुखावणार आहे.

मान्सून बाबतचा पहिला अहवाल आज हवामान खात्याने जाहीर केला. या अहवालानुसार यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल.

तसेच 2020 या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या 100 टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे 5 किंवा -5% असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी मान्सून उशिरा आला होता आणि पाऊस कमी पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीही लांबली होती. मोठं नुकसान झालं होतं यंदा मात्र मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.