रहाणेची जागा घेणार ‘हा’ मुंबईकर म्हणाला, ‘मी तयार’

रहाणेची जागा घेणार ‘हा’ मुंबईकर म्हणाला, ‘मी तयार’

virat

इंग्लंड : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी खूप निराशाजनक कामगिरी केली. असेच काहीसे लीड्स कसोटी सामन्यातही घडले आणि भारतीय संघ वाईटरित्या पराभूत झाला.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेची कामगिरीही या सामन्यात खूपच खराब दिसून आली. त्याने दोन्ही डावांमध्ये फक्त 28 धावा केल्या. अजिंक्य रहाणे सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरला. तसेच चेतेश्वर पुजारा, विराट कोहली देखील फलंदाजीत अपयशी ठरत आहेत.’ टीम इंडियाची बॅटिंग अपयशी ठरत असतानाच मुंबईचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आपण टेस्ट खेळण्यासाठी तयार आहोत, असं म्हणाला आहे.

इंग्लंडविरुद्ध यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सीरिजवेळी अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या खांद्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान, इंडिया टुडेशी बोलताना श्रेयसन आपलं टेस्ट क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असल्याचे म्हंटले आहे.’

पुढे श्रेयश म्हणाला, माझ्या क्रिकेटचा प्रवास लाल बॉलने सुरू झाला. माझं रणजी ट्रॉफी करियरही चांगलं आहे. मी टेस्ट टीमचा भाग बनू शकतो, असं मला वाटतं, तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल. मी याबाबत सकारात्मक आहे,अशी प्रतिक्रिया अय्यरने दिली.’

महत्त्वाच्या बातम्या