‘सचिन सावंतसारख्या लुक्क्यावर मी बोलत नाही, कारण तेवढी त्याची औकात नाही’

मुंबई : देशात पेगासस प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रातील काही अधिकारी २०१९ मध्येच इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेल्याचे स्पष्ट झालं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची कबुली देताना हे अधिकारी कृषी अभ्यासासाठी गेल्याचे म्हटले होते. पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी या दौऱ्याबाबत झालेला पत्रव्यवहारच उघड केला आहे. पत्रामध्ये कुठेही कृषी अभ्यासाचा उल्लेख नसल्याने फडणवीसांची अडचण झाली आहे.

तसेच सावंत यांनी यांनी फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेला झोलयुक्त शिवार योजना म्हणत त्याच्या चौकशी अहवालाचं स्वागत केलंय. जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. या झोलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत गेले पाहिजे अशी टीका सावंत यांनी केली.

दरम्यान, सावंत यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. सावंत यांना कांदिवलीत ५ लोकं ओळखत नाही. पण ते फडणवीस आणि मोदींवर टीका करतात हा मोठा विनोद असल्याचे ट्विट राणे यांनी केले आहे.

राणे म्हणाले, ‘काँग्रेसच्या सचिन सावंत सारख्या लुक्क्यावर मी कधी बोलत नाही कारण तेवढी त्याची औकात नाही. हा कांदिवलीत राहतो पण कांदिवलीत 5 लोकं याला ओळखत नाही, निवडणूक लढवायची हिम्मत नाही कारण एकदा लढवून डिपॉझिट जप्त झालं होतं, हा माणूस फडणवीस व मोदी साहेबांवर टीका करतो हा मोठा विनोद आहे’.

महत्वाच्या बातम्या

IMP