मी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नाही, मोदींच्या नेतृत्वातच निवडणूक लढणार – गडकरी

पुणे: मी पंतप्रधानपदासाठी शर्यतीत असल्याच्या चर्चा माध्यमांत सुरु आहेत. मात्र या केवळ चर्चाच असून आगामी निवडणूक देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच लढवणार असल्याच केंद्रीय रेस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या विधानांचा विपर्यासकरून पक्ष आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काहीजण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दोन दिवसांपूर्वी नागरी बँकांच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी, विजय मिळाला की त्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे येतात. पराभव मात्र अनाथ असतो. तुम्हाला यश मिळाले की श्रेय घेण्याची स्पर्धा लागते. अपयशाची जबाबदारी घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते. गडकरी यांचे विधान मोदी – शहा यांच्यावर निशाना असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले.

या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर गडकरी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विधानाबाबतचा खुलासा केला.

Loading...

मी जे काही बोललो त्यात निवडणुकीचा कोणताही संदर्भ नव्हता. माझ्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली. यापूर्वीही सातत्याने असे झाले आहे. वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असेल तर बोलणेच कठीण, असं गडकरी म्हणाले.