‘मी मेलेलो नाही’ ; हॉलिवूड सिनेमातून कमबॅक करत हरीश पटेल यांचे स्पष्टीकरण

‘मी मेलेलो नाही’ ; हॉलिवूड सिनेमातून कमबॅक करत हरीश पटेल यांचे स्पष्टीकरण

Harish Patel

मुंबई : हॉलिवूड सिनेमा ‘इटर्नल्स’ (‘Eternals’) चा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर अभिनेता हरीश पटेल (Harish Patel)यांच्या बद्दल जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेता हरीश पटेल (Harish Patel) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा असून त्यांनी अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमात भूमिका केल्या आहेत. मात्र, बरीच वर्ष झाली हरीश हे भारत सोडून यूकेमध्ये शिफ्ट झाले आहेत. ज्यामुळे ते बऱ्याच वर्षापासून बॉलिवूड किंवा टीव्हीवर दिसले नाहीत. अशात ‘लोकांना वाटत होतं की, हरीश आता या जगात नाहीत. याबाबत ‘मी मेलेलो नाही’ असे स्पष्टीकरण देत खंत व्यक्त केले आहे.

दरम्यान एका मुलाखतीत हरीश म्हणाले, ‘माझा हॉलिवूड सिनेमा ‘Eternals’ चा ट्रेलर पाहिला. तेव्हापासून माझ्याबाबत चर्चा होऊ लागली. अचानकपणे मी पुन्हा लोकांच्या नजरेत आलो. याआधी लोकांनी हे मान्य केलं होतं की, मी आता या जगात नाही. हरीश पुढे म्हणाले की, मी हा विचार करत होतो की, असं काही मानण्याआधी लोकांनी मला एकदा विचारलं का नाही? चला गुगल तरी सर्च करायचं असतं की, हरीश पटेल जिवंत आहे की गेला. कारण मी इथे काम करत नव्हतो. किंवा दिसत नव्हतो. तर लोकांनी मान्य केलं की, मी आता नाही

हरीशची १९९८ मध्ये आलेल्या ‘गुंडा’ सिनेमातील भूमिका फार गाजली होती. यूकेमध्ये हरीश थिएटरवर काम करत आहेत. तेथील जीवनाबाबत हरीश म्हणाले की, ‘मला इथे माझं पहिलं प्रेम थिएटर जिवंत ठेवण्याची संधी मिळाली. रॉयल नॅशनल थिएटरमध्ये ‘राफ्ता राफ्ता’ नाटक खूप गाजलं. तसेच ते तिथे अनेक टीव्ही मालिकांचाही भाग झाल्याचं ही सांगीतले. आता मात्र हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बघून लोकांनी शोधणं सुरू केलं. यावर हरीश म्हणाले की, अचानक त्यांच्या इंटरनॅशनल प्रोजेक्टनंतर लोकांनी त्यांचा शोधणं सुरू करत आहेत. तसेच तब्बल १४ वर्षानंतर लोकांचं माझ्यवर इतकं प्रेम दिसू लागलं आणि लोक म्हणू लागले होते की, सर तुम्ही आधी का सांगितलं नाही’. हरीश यांनी नुकताच हॉलिवूड सिनेमा ‘इटर्नल्स’ (‘Eternals’) च्या माध्यमाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.

अभिनेता हरीश पटेलचे काही फोटो पहा.

 

 

महत्वाच्या बातम्या