fbpx

मी पाकिस्तानला घाबरत नाही, तर चर्चेला कशाला घाबरेन ? गंभीरचा केजरीवालांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : पूर्व दिल्लीतील निवडणूक यंदा देशभरात चर्चेत आहे. कारण या मतदारसंघातून भाजपने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात आपने आतिशी यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने अरविंदर सिंह लवली यांना रिंगणात उतरविले आहे. यापैकी केवळ अरविंदर सिंह लवली यांनाच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. बाकी दोघेही राजकारणात नवे आहेत.

आता माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चर्चेचे आव्हान दिले आहे. मी पाकिस्तानला घाबरत नाही, तर चर्चेला कशाला घाबरेन. असा टोला लगावत गंभीरने केजरीवालांना टोला लगावला आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात जेवढा वेळ दिला आहे. त्याच्या निम्मा मला देऊ द्या आणि नंतर आपने चर्चेसाठी वेळ आणि जागा निश्चित करावी, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

मतदारसंघात केलेल्या भाषणामध्ये गौतम गंभीर याने अरविंद केजरीवाल हे केवळ चर्चा, धरणे आंदोलन आणि नाटकबाजी करण्यातच चांगले आहेत, अशी टीकाही केली. माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचे आव्हान त्यांनी खूप वेळा दिले आहे. कधी कधी ते म्हणतात माझ्याकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत. आता तर अरविंद केजरीवाल म्हणताहेत की मी वर्षातील २४० दिवस परदेशात वास्तव्याला असतो.