मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही ; पंकजा ताईंंचा धनुभाऊला टोला

टीम महारष्ट्र देशा : काही दिवसापूर्वी व्हायरल झालेला धनंजय मुंडे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओ मध्ये धनंजय मुंडे 0 वर बाद झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लक्ष्य करून आपण पहिल्या बॉललाच विकेट घेणार आहे अशी टीका केली होती. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही, असा टोला धनंजय मुंडे यांना लावला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला गोपीनाथ मुंडेनी मैदानी खेळ सुद्धा कसे खेळावे लागतात हे सांगितले आहे. त्यामुळे मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही. तसेच काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

Loading...

दरम्यान बंगळूर एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी होती. ही मागणी पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली. या भगिनींनी घाटनांदूर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले. त्यावेळी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील