माझ ठरलंय ! निवडणूक रासपकडूनचं लढणार : राहुल कुल

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून रासप आ. राहुल कुल हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल कुल हे भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याचं डंका वाजवला आहे. मात्र या चर्चेला राहुल कुल यांनी पूर्णविराम दिला आहे. मी रासपमधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची काळजी करू नये, असा सल्ला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे.

राहुल कुल म्हणाले की, भाजपने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी भाजपकडे अर्ज केला नाही आणि मुलाखतींना गेलो नाही. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला किंतू असण्याचे कारण नाही. त्यामुळे महादेव जानकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी रासपमधून निवडणूक लढविणार आहे.

दरम्यान राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढल्या होत्या. त्यामुळे राहुल कुल देखील भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. तसेच अनेक भाजप नेत्यांशी कुल यांचे जवळचे संबंध आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत आमदार कुल यांनी वरवंड येथे केले होते. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या कामकाजाचे कौतुक केले होते.