fbpx

मी इंजिनिअर, मला माहित आहे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही असा दावा केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या दाव्याला महत्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी “ईव्हीएम हॅक करता येत नाही, ईव्हीएम फारतर फार बदलता येऊ शकते. मी इंजिनिअर आहे, त्यामुळं सांगू शकतो ईव्हीअम हॅक करता येत नाही.”असं विधान केले आहे. तसेच निवडणूक आयोगातले मतभेद पुढे आले आहेत. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे एक डिपार्टमेंट झालंय असं काम सुरु आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

दरम्यान, एक्झिट पोल हा आता पोरखेळ झाला आहे. या सरकारचा निश्चित पराभव होईल.मोदी किंवा एनडीएचा कुठलाही नेता पंतप्रधान होणार नाही. मोदींनी जी पत्रकार परिषद घेतली ती शेवटची पत्रकार परिषद होती, जी एनडीएची बैठक झाली ती सुद्धा शेवटची होती असं चव्हाण म्हणाले आहेत.