fbpx

धक्कादायक : प्रोटीन पावडरमध्ये होतोय स्टेरॉईड संप्रेरकाचा बेकायदा वापर

टीम महाराष्ट्र देशा- व्यायामशाळेतून ताकद वाढीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये स्टेरॉईड या तात्पुरत्या उत्तेजना देणाऱ्या संप्रेरकाचा बेकायदा वापर होत असल्याचं पुण्यात एका तपासणीत आढळून आल्यानंतर आता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या प्रोटीन पावडरीची राज्यव्यापी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रोटीन पावडरमध्ये स्टेरॉईड मिसळणाऱ्यांचं मोठं रॅकेट राज्यात कार्यरत असून ते या मोहिमेच्या माध्यमातून नष्ट केलं जाईल, असा विश्वास अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी व्यक्त केला.