चढ्या भावाने दारुची अवैध विक्री, दारूची वाहतूक करणारा अटकेत

औरंगाबाद : कारमधुन देशी-विदेशी दारूची वाहतूक करणा-याला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही कारवाई मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली. नवनाथ श्रीमंत बोडखे (३२, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) असे दारु विक्रेत्याचे नाव आहे. तो संचारबंदीच्या काळात चढ्या भावाने कारमधुन देशी-विदेशी दारूची विक्री करत होता.

कारमधुन नवनाथ बोडखे हा देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याची पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. त्याआधारे उपनिरीक्षक मिरा चव्हाण, विकास खटके, जमादार रमेश सांगळे, लक्ष्मण हिंगे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, निखील खराडकर, विलास डोईफोडे, गजानन गोलवाल व माया उगले यांच्या पथकाने गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर चौक या रस्त्यावरील हनुमान चौकात नाकाबंदीदरम्यान कार (एमएच-२०-एफटी-०१४०) थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कार चालकाने धुम ठोकताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. भारतनगरजवळ पोलिसांनी कार अडवून तिची झडती घेती. तेव्हा कारच्या डिक्कीत जवळपास ५७ हजार रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या