औरंगाबादः औरंगाबाद महापालिका हद्दीत थेट स्मशानभूमीतच अनधिकृत प्लॉटिंग झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग झाल्याचे पाहावयास मिळाले. मात्र स्मशानभूमीच्या जागेवरच अनधिकृत कब्जा करून प्लॉटिंग झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही प्लॉटिंग निष्कासित केली आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून नेहमीच बेकायदेशीर फ्लॉटिंग धारकांवर कारवाई केली जात आहे. भूमाफियांकडून बेकायदा प्लॉटिंगची सर्रास विक्री सुरु आहे. शहरात नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अनधिकृत प्लॉटिंगचे सुरु असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले. आता तर स्मशानभूमीच्या जागेपर्यंतही भूमाफियांची मजल गेल्याचे दिसून आले आहे. शहानूरवाडी येथील सर्व्हे नंबर ४२ मधील गट क्रमांक १ मध्ये स्मशानभूमीसाठी राखीव जागा आहे.
त्यावर अनधिकृत प्लॉटिंग करून प्लॉट विक्रीची व्यवसाय सुरु होता. मनपाच्या अतिक्रमण विभागाला त्याची माहिती मिळाली, त्यानंतर सोमवारी येथे कारवाई करण्यात आली. महापालिकेने शहानूरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेी आहे. त्या जागेवर राजेंद्र वाणी, सुमित्रा वाणी, आशा पाचपुते आणि इतर काही जणांनी अनधिकृत प्लॉटिंग केली होती. त्याची विक्रीही सुरु झाल्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेने येथे कारवाई केली. याप्रकरणी नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ममता यांच्या भेटीनंतर पवारांनी कॉंग्रेसबद्दल केलं ‘हे’ मोठं विधान
- …मग 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का?- सदाभाऊ खोत
- ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर…