अभिनेत्री इलियाना डिक्रूजने थाटले गुपचुप लग्न

टीम महाराष्ट्र देशा- ‘रुस्तम’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन चर्चेत आली आहे. या लेटेस्ट पोस्टनंतर इलियानाने लग्न केले असल्याचे समजते. हा फोटो तिच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा असून फोटोजे क्रेडिट तिने बॉयफ्रेंड एंड्र्यू नीबोनला दिले आहे. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, एंड्र्यूचा उल्लेख इलियानाने हबी अर्थातच हसबंड असा केला आहे.

काही दिवसांपूर्वी इलियानाने एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते.
यापूर्वीदेखील इलियाना आणि नीबोन यांनी ऑस्ट्रेलियात गुपचुप लग्न केल्याची बातमी आली होती. पण यावर दोघांनीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

Ileana Lip-Lock With Her BFएंड्रयू नीबोन ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर आहे. या दोघांनी त्यांचे रिलेशनशिप कधीही लपवून ठेवले नाही. काही दिवसांपूर्वी इलियाना आणि नीबोन यांनी एका अवॉर्ड फंक्शनला सोबत हजेरी लावून रिलेनशिपची कबुली दिली होती. इलियाना गेल्या चार वर्षांपासून नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Andrew Kneebone1 नोव्हेंबर 1987 रोजी पुण्यात जन्मलेली इलियाना कॅथलिक फैमिलीतून आहे. इलियानाची मातृभाषा कोंकणी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने जाहिरातींमध्ये काम केले होते. 2006 मध्ये रिलीज झालेला ‘देवदासु’ हा इलियानाचा पहिला चित्रपट आहे.

akshay-kumar-onscreen-wife-ileana-dcruz-secretly-marry-boyfriend-andrew-kneebone

2012 मध्ये अनुराग बासू यांच्या ‘बर्फी’ या चित्रपटातून इलियानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर इलियानाने फटा पोस्टर निकला हीरो, मैं तेरा हीरो, हॅप्पी एंडिंग, किक-2 आणि रुस्तम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.barfi

You might also like
Comments
Loading...