fbpx

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर; देशात प्रणव गोयल तर राज्यात ऋषी अग्रवाल प्रथम

मुंबई: आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. २० मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

या परीक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयलने ३६० पैकी ३३७ गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. यंदा देशभरातून १,५५,१५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षार्थींना जेईईच्या jeeadv.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.