25 वर्षीय एरोनॉटिकल इंजिनियर बनली गावची सरपंच

माजलगाव : 25 वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या एरोनॉटिकल इंजिनियर तरुणीने मंजरथ या गावच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे. दोन पुरुष उमेदवारांचा पराभव करून तिने ही मजल मारली आहे . ऋतुजा उच्च शिक्षित असून तिने ऐरोनॉटिकल सायन्स मध्ये एम.टेकची पदवी प्राप्त केली आहे.

मंजरथ या गावाचे सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव होते. यामुळे या निवडणुकीत चुरस होती. असे असताना देखील निवडणूक लढवून ऋतुजाने या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत तिने विजय अक्षरशः खेचून आणला.

एरोनॉटिकल इंजिनियर आहे ऋतुजा

ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.