‘तथ्यांकडे दुर्लक्ष करून कोरोनाच्या प्रसारामध्ये केंद्र महाराष्ट्राला टार्गेट करत आहे’

P Chidambaram

नवी दिल्ली : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील ‘महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही,’ असा आरोप केला होता. दरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर निशाणा साधत केंद्र सरकार वर टीका केली आहे.

यावेळी चिदंबरम ट्विट करत म्हणाले, ‘केंद्र सरकार तथ्यांकडे दुर्लक्ष करत कोरोनाच्या प्रसारावरून महाराष्ट्राला टार्गेट करत आहे. महाराष्ट्रात 80% आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाला आहे. यामध्ये जवळपास वीस राज्य महाराष्ट्राच्या माग आहेत. त्यातबरोबर फ्रन्टलाइन श्रमिकांचे 73% लसीकरण महाराष्ट्रात झाला असून यामध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे असं आरोग्य मंत्र्यांनीच सांगितले आहे.’

पुढे चिदंबरम म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्य मंत्री यांना एका आरशासमोर उभा करत प्रश्न विचारला पाहिजे की केंद्राने महाराष्ट्राला पुरेशा लसींचा पुरवठा केला आहे का ?’ लसीकरण कार्यक्रमातील गोंधळ ही केंद्र सरकारची जबाबदारी असून यामध्ये अपुरा लसींचा पुरवठा कारणीभूत आहे.’ अशी टीका यावेळी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

“करोनाच्या प्रसारासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला लक्ष्य केलं जात आहे. देशाच्या आरोग्य मंत्र्यांना एका आरशासमोर उभं राहून विचारायला हवं की केंद्र सरकारने खरंच महाराष्ट्राल जितकी गरज आहे तितका लसपुरवठा केला आहे का? लसीकरण कार्यक्रमातील संपूर्ण गडबडीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, त्यात लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा न करण्याचाही समावेश होतो”, अशी जोरदार टीका चिदंबरम यांनी केली. शिवाय, “८० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण महाराष्ट्राने केलं आहे, जवळपास २० राज्ये महाराष्ट्रापेक्षा मागे आहेत. वरीष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यामध्येही महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे, आणि ही सर्व माहिती आरोग्य मंत्र्यांच्याच विधानातून मिळाली”, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या :