तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं तर यात्रा कशासाठी? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पवार यांनी ‘तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाचं हे सरकारचे अपयश आहे असा आरोप सरकारवर केला.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खूप काही दिलं तरी ते गेले. पुर्वी निष्ठा होती परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेले नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते आज घडतंय असंही पवार म्हणाले.

Loading...

तसेच पुढे बोलताना पाच वर्षांत राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. निव्वळ आश्वासन दिली जात आहेत. सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. क्राईम मोठ्याप्रमाणात वाढले आहे. हे सगळं संपवायचं असेल तर आघाडीला निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.

दरम्यान पुढे बोलताना भाजपाने नवीनच पद्धत अवलंबली आहे. ते निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा अंदाज बघतात आणि त्यांना गोळा करत आहेत. हे लोकशाहीला मारक आहे लोकशाहीचा गळा घोटणारे आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार राहुल पोटे आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट