टीम महाराष्ट्र देशा: भारत India हा विविधतेने नटलेला देश असून उत्कृष्ट संस्कृतीसाठी ओळखला जातो. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक भारतातील एकता आणि संस्कृती बघण्यासाठी येतात. भारतामध्ये निसर्गसौंदर्याने नटलेले अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण त्याचबरोबर तुम्हाला भारतात नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा असलेला ठिकाणांचा एक अनोखा संगम देखील बघायला मिळेल. हाच विशेष संगम बघण्यासाठीच पर्यटक भारतामध्ये गर्दी करतात. आज अशाच काही ठिकाणांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत जिथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्यासोबत ऐतिहासिक वास्तू देखील बघायला मिळतात.
शिलाँग
मेघालय राज्यातील शिलॉंग हे शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले असून इथे तुम्हाला स्कॉटलंड सारखी मैदाने बघायला मिळतील. शिलॉंग या शहरांमध्ये अनेक अशी एतिहासिक संग्रहालय आहे जी पर्वत आणि शिखरांच्या मध्ये वसलेली आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीत तुम्ही शिलॉंगला भेट देऊ शकतात कारण या काळामध्ये मध्ये खूप सुंदर आणि आकर्षित दिसते.
राजस्थान
कुठल्याही शहराचा उल्लेख न करता सरळ राज्याचा उल्लेख यासाठी केला आहे कारण राजस्थान मध्ये एक दोन नाही तर, अनेक अशी शहर आहे जिथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य सोबत इतिहासाचा देखील अनुभव घेता येईल. यामध्ये प्रामुख्याने उदयपूर, पुष्कर, जैसलमेर, जोधपुर, जयपुर, इत्यादी शहरांचा समावेश होतो. या शहरांमध्ये तुम्हाला किल्ले, तलाव, राजवाडे आणि त्याचबरोबर अनेक ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतील. त्याचबरोबर राजस्थानमध्ये तुम्हाला उंट महोत्सव, हत्ती महोत्सव, गणगौर महोत्सव इत्यादी गोष्टी सुद्धा बघायला मिळतील.
गोवा
गोवा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर फॉरेनची चित्र उभे राहते. पण तसे असले तरी गोव्यामध्ये अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या गोष्टी आहेत. विशेषता गोव्यामधील जुने चर्च आणि घरे पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आनंद लुटणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
कोलकाता
बंगालची राजधानी असलेले कोलकत्ता शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. कोलकत्ता शहरामध्ये स्थित असलेला हावडा ब्रिज पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. कोलकत्ता शहरांमध्ये तुम्हाला संग्रहालय, म्युझियम, गार्डन इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. यामध्ये प्रामुख्याने विक्टोरिया मेमोरियल, सायन्स सिटी, कालीघाट, इंडियन म्युझियम इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.
महत्वाच्या बातम्या
- Viral Video | किंग कोब्राला Kiss करणाऱ्या ‘या’ माणसांचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Gopichand Padalkar | “जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल”; भाजप नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ
- Skoda Kushaq | Skoda Kushaq लवकरच दिसणार नव्या अवतारात
- Narayan Rane । “फोटोवर दुसरा कागद टाका आणि…”; ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेला राणेंचं प्रत्युत्तर
- Travel Guide | ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम Hills Station