प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अधिवेशनाच्या आधी मंत्रीपदाचा निर्णय घ्या- राणे

टीम महाराष्ट्र देशा- मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आता मी भविष्य काही सांगू शकत नाही. माझे भविष्य खरे ठरलेले नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगण्याचे धाडस मी करणार नाही; भाजपला सरकारची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अधिवेशनाच्या आधी मंत्रीपदाचा निर्णय घ्यावा असं आवाहन माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी भाजपला केलं आहे. काल नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

रिफायनरीला माझा विरोध- राणे

जोवर लोकांची सहमती नसेल तोवर नाणारचा सामंजस्य करार करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोकणातील रिफायनरीला माझा विरोध कायम आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ग्रामस्थांचे मन वळवणार; पण कोकणी माणूस मुख्यमंत्र्यांचे ऐकणार की राणेंचे , असा सवालही त्यांनी केला.

शिवसेनेवर टीका-
एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटून विरोध करायचा आणि दुसरीकडे कंपनीशी साटेलोटे करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी गुरुवारी केला.रत्नागिरी जिल्हय़ातील नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी परवानग्या मिळवून दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या परवानग्या द्यायला सांगितल्या असं देखील त्यांनी म्हटलं आहे .