टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताना आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन यांचा समावेश आहे. त्यामुळे हिवाळा येतात आपल्याला आरोग्य (Health) कडे जास्त लक्ष द्यावे लागते. त्याचबरोबर हिवाळा येतात घरातील कपाटामधील उबदार कपडे, रजाई इत्यादी गोष्टी बाहेर पडायला लागतात. त्याचबरोबर थंडीमध्ये आपण शरीराला आणि घराला उबदार ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतो. तुम्हाला माहित आहे का? थंडीमध्ये आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्याने शरीराला उबदारपणा येतो. होय, थंडीमध्ये काही गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्यास तुम्हाला उबदार पणा येऊ शकतो. त्याबद्दलचं आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
गुळ
गुळाचे सेवन नेहमी शरीरासाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये गुळाचे सेवन केल्यावर तुम्हाला थंडीमध्ये उबदारपणा जाणवेल. कारण गुळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅलरीज उपलब्ध असतात त्यामुळे त्या आपल्याच शरीराची थंडीपासून सुरक्षा करू शकतात. गुळाचे सेवन तुम्ही चहा किंवा दुधासोबत देखील करू शकता.
मध
हिवाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला उबदारपणा तर मिळतोच पण त्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये रोज सकाळी एक चमचा मधाचे सेवन करावे. त्याचबरोबर मध सर्दी खोकला ताप इत्यादी आजारांपासून तुमचे संरक्षण करेल.
आले
हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आले हा एक रामबाण उपाय आहे. आल्याचा उपयोग तुम्ही चहा पासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींच्या माध्यमातून करू शकता. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आल्याचे नियमित सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होईल.
दुध
प्रत्येक ऋतूमध्ये दूध पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण थंडीच्या मोसमात दूध पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि कॅल्शियम उपलब्ध असतात. त्यामुळे दूध आपल्या शरीराला निरोगी ठेवून उब प्रधान करते.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या , “…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते”
- Haunted Railway Station | ‘हे’ आहेत भारतातली सर्वात भयानक रेल्वे स्टेशन
- Amol Mitkari | “देशी गुंडांच्या नादाला लागून सरकारने…” ; जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर अमोल मिटकरींची टीका
- Jitendra Awhad | “फाशी दिली तरी चालेल, पण…”; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत प्रतिक्रिया