Share

Nail Care Tips | नखांवरील चमक वाढवायची असेल तर ‘या’ खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी आणि शरीर सौंदर्य टिकविण्यासाठी योग्य प्रकारचा आहार घेणे खूप आवश्यक आहे. जर आपण व्यवस्थित पद्धतीने आहार नाही घेतला तर हळूहळू आपले शरीर कमजोर होऊ लागते. त्याचबरोबर विटामिनच्या अभावामुळे शरीरातील काही भाग काम करणे बंद करतात. त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या आहाराची योग्यरीत्या काळजी घेतली नाही तर तुमच्या नखं (Nail) वरील चमक देखील कमी होऊ लागते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नखारांवरील चमक वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकता.

नखांची Nail चमक वाढवण्यासाठी पुढील गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा

बीन्स

बीन्स आपल्या शरीरासाठी खूप पोषक असते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि बायोटीन उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही नियमितपणे बीन्सचे सेवन केल्यावर तुमच्या नखांची चमक वाढेल. त्याचबरोबर बिया असलेल्या भाज्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या नखावरील चमक वाढू शकते.

अंडी

अंडे खाणे हे फक्त नखांसाठी नाहीस तर पूर्ण शरीरासाठी खूप उपयोगी ठरू शकते. कारण अंड्यामध्ये प्रोटीन विटामिन बी, विटामिन 12 आणि विटामिन ई इत्यादी घटक आढळतात. त्यामुळे अंड्याचे नियमित सेवन केल्याने नखे तर लवकर तुटत नाही पण तुमच्या नखांवरील चमक देखील कायम राहते.

सूर्यफुलाच्या बिया

नखांना निरोगी ठेवण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया हा एक रामबाण उपाय आहे. कारण यामध्ये विटामिन बी 6, झिंक आणि विटामिन ई मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे तुम्हाला तुमची नक्की निरोगी ठेवायची असेल तर सूर्यफुलाच्या बियांचा तुमच्या आहारात समावेश करा.

हिरव्या भाज्या

नखे आणि एकंदरीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामध्ये प्रामुख्याने पालक, ब्रोकोली आणि कॉलर्ड यांचा समावेश करा. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे तुमचे नक्की तुटण्याची समस्या दूर होऊन तुमचे नखे निरोगी राहू शकतात.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी आणि शरीर सौंदर्य टिकविण्यासाठी योग्य प्रकारचा आहार घेणे खूप आवश्यक आहे. जर आपण व्यवस्थित पद्धतीने …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now