भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्या : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीआधी एका मंत्र्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू वाटा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. भाजपकडून अशा भेटवस्तू आल्या तर त्या मतदारांनी नाकाराव्यात आणि भाजपला खरोखरच भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्याव्यात, आम्ही त्यांचे स्वागतच करू असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचार शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.

अखेर जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

भाजप सरकारला गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मराठा, धनगर व अल्पसंख्यांक समाजाला दिलेली आश्वासने या सरकारला पाळला आली नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेचा रोष वाढू लागल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीतील विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा टाळण्याची नामुष्की आली आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली.

दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा – जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांनी नाणार जाणार की नाही हे पारदर्शीपणे सांगावे – जयंत पाटील

You might also like
Comments
Loading...