Share

Hair Care Tips | केसांमधील कोरडेपणाची समस्या दूर करायची असेल तर वापर ‘हे’ तेल

टीम महाराष्ट्र देशा: केस (Hair) दाट आणि चमकदार असेल तर त्यांना आपण निरोगी केस म्हणतो. त्याचबरोबर कोरडे केस असल्यास आपण त्याला खराब केस म्हणून संबोधतो. आजकाल बदलत्या वातावरणामुळे केसांमध्ये कोरडेपणाची समस्या दिसून दिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत केसांची निगा राखणे हे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे तुमचेही केस कोरडे होत असतील, आणि तुम्ही त्यासाठी उपाय शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केसांमधील कोरडेपणा दूर करण्यासाठी केसांना कोणते तेल लावले पाहिजे याबद्दल आम्ही या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

ऑलिव्ह ऑइल

याबद्दलच्या वातावरणामध्ये कोरड्या केसांना ओलावा देण्यासाठी ऑलिव्ह ऑइल प्रभावी ठरू शकते. ऑलिव्ह ऑइल मुळे केसांवरील कोरडेपणा दूर होत नाही तर यामुळे केसांना मऊपणा देखील येतो. त्याचबरोबर यामध्ये उपलब्ध असलेले विटामिन ई केसांमध्ये चमक आणण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला नियमितपणे दहा ते पंधरा मिनिटे ऑलिव्ह ऑइल केसांना मसाज करावी लागेल.

खोबरेल तेल

केस निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेल हा एक सर्वोत्तम उपाय आहे. कारण खोबरेल तेल हे एक नैसर्गिक तेल असून यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते. त्यामुळे खोबरेल तेलाच्या नियमित वापराने आपल्या केसांच्या आरोग्य सुधारू शकते. यासाठी तुम्हाला नियमितपणे केस धुण्याच्या अर्धा तास आधी डोक्यांना हलक्या हाताने मसाज करत खोबरेल तेल लावावे लागेल.

कांद्याचे तेल

कांद्याचे तेल देखील केसांची निगा राखण्यासाठी चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही बाजारातून कांद्याचे तेल विकत न घेता घरी ते बनवू शकतात. हे तेल घरी बनवण्यासाठी एक कांदा किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यानंतर एका भांड्यात खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये कांद्याचा रस टाका. तेलामध्ये कांद्याचा रस उकळल्यानंतर ते तेल डोक्याला लावा. नियमितपणे या तेलाने डोक्यावर मसाज केल्यास केस गळती तर थांबतेस पण त्याबरोबर केसही मजबूत होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: केस (Hair) दाट आणि चमकदार असेल तर त्यांना आपण निरोगी केस म्हणतो. त्याचबरोबर कोरडे केस असल्यास आपण …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now