“गोमांस खायचे असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या”.

वेबटीम : अतिथी देवो भव: ,अतुल्य भारत अशा टॅग लाइन मिरवणाऱ्या पर्यटन विभागाने परदेशी पर्यटकांचे स्वागात करण्याऐवजी त्यांना एक सल्ला  दिला आहे. “गोमांस खायचे असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या,” असा सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम यांनी परदेशी पर्यटकांना दिला आहे.

अनेक राज्यांमध्ये गोमांसावर बंदी असून, त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसत असल्याबद्दल अल्फॉन्स यांना एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ‘ते (पर्यटक) त्यांच्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे त्यांनी भारतात येण्याआधी त्यांच्या देशातूनच गोमांस खाऊन यावे,’ असे उत्तर अल्फॉन्स यांनी दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यावेळी अल्फॉन्स यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

याआधी काही दिवसांपूर्वीच केरळचे लोक गोमांस खाऊ शकतात, असे विधान पर्यटनमंत्री अल्फॉन्स यांनी केले होते. ‘ज्याप्रकारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांसावर कोणतीही बंदी आणलेली नाही, त्याचप्रकारे केरळमध्येही गोमांस विक्री चालू राहिल,’ असे त्यांनी म्हटले होते.