Share

Diwali Rangoli 2022 | दिवाळीमध्ये आकर्षक रांगोळी काढायची असेल तर, ‘या’ टिप्स फॉलो करा

टीम महाराष्ट्र देशा: देशात सगळीकडेच दिवाळीची धूम सुरू असून घरोघरी सजावटी आणि साफसफाईचा जोर वाढला आहे. दिवाळीच्या सजावटीमध्ये प्रामुख्याने दिवे फुलं रांगोळी Rangoli इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. दिवे तर दिवाळीची शोभा वाढवतात पण दिवाळीच्या सौंदर्यात अजून भर घालण्यासाठी आपण रांगोळीचा उपयोग करत असतो. दारासमोर सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढल्यानंतर दिवाळी सणाचे वातावरण अधिक प्रसन्न बनते. कारण रांगोळीमध्ये वापरलेले रंग खूप आकर्षक दिसतात. त्यामुळे दिवाळीत रांगोळी काढताना प्रत्येकाच्या मनावर एक प्रश्नचिन्ह उभे राहते की, कशी रंगोळी काढावी? त्यामुळेच आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला रांगोळी काढण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी रांगोळी काढत असाल तरी रांगोळी काढणे तुम्हाला सोपे जाईल.

रांगोळी काढण्याच्या सोप्या पद्धती

  • तुम्ही जर पहिल्यांदा रांगोळी काढणार असाल, तर सर्वात आधी तुम्ही एक साधी डिझाईन निवडा. कारण कठीण डिझाईन काढण्यासाठी खूप मेहनत आणि खूप वेळ लागू शकतो त्यामुळे एकदम साधी डिझाईन निवडा.
  • रांगोळीची डिझाईन निवडल्यानंतर रांगोळी काढण्यासाठी समान पृष्ठभाग निवडा. कारण खडबडीत जागी रांगोळी काढल्यास ती रांगोळी बिघडण्याची शक्यता जास्त असते.
  • दिवाळी हा सण चार-पाच दिवस साजरा केला जातो त्यामुळे तुम्हाला एक रांगोळी अनेक दिवस टिकून ठेवायची असेल, तर ती रांगोळी दाराच्या मधोमध न काढता एका बाजूला काढावी म्हणजे ती रांगोळी चार ते पाच दिवस टिकेल.
  • रांगोळीला सुबक आणि व्यवस्थित बनवण्यासाठी तुम्ही रांगोळी काढण्यासाठी बांगड्या, बाटलीची झाकणे, ताट, कंगवा इत्यादी गोष्टींचा वापर करू शकता. या गोष्टी वापरण्यासाठी तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओंची मदत घेऊ शकता.
  • रांगोळी काढण्यासाठी तुमची रेखाचित्रे फारशी चांगली नसतील तर फ्री हँड रांगोळी काढणे टाळून तुम्ही एक आकर्षक ठिपक्यांची रांगोळी काढू शकता.
  • तुम्ही जर पहिल्यांदा रांगोळी काढत असाल तर सर्वप्रथम खडू किंवा पेनच्या मदतीने रांगोळीची डिझाईन बनवून घ्या आणि त्यानंतर त्यावर रांगोळीने बॉर्डर करा.
  • रांगोळी व्यवस्थित रेखाटल्यानंतर त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन करून आकर्षक कलर भरा.
  • रांगोळीला अजून आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही रांगोळीला दिव्यांनी सजवू शकतात. पण एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे घरात पाळीव प्राणी किंवा लहान मुले असतील तर तेलाच्या दिव्यांऐवजी तुम्ही रांगोळी मध्ये विजेचे दिवे लावू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशात सगळीकडेच दिवाळीची धूम सुरू असून घरोघरी सजावटी आणि साफसफाईचा जोर वाढला आहे. दिवाळीच्या सजावटीमध्ये प्रामुख्याने दिवे …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now