मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर या ! आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुंबई : शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी घोषणा केली. तसेच शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णयावर ठाम आहे. परंतु मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजप बरोबर रहा ! असा सल्ला रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. ते आज जागतिक योग दिनानिमित्त एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

तसेच जम्मू काश्मीरमध्ये भाजपने राजकीय फायद्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी तोडली. असा घरचा आहेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला.

आठवले म्हणाले, भाजपनं राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी पीडीपीशी युती केली आणि आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली. पीडीपीशी युती कायम ठेवल्यास २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका पडेल असा विचार करूनच भाजपनं युती तोडली.

शरद पवारांनी ‘पगडी’चे वक्तव्य आत्ताच का केले ?- संभाजी ब्रिगेड

भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेनेत उभी फूट पडेल – रामदास आठवले