fbpx

चुकांवर माफी मागून यायचं असेल तर राष्ट्रवादी तयार

अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : जशा जशा लोकसभा निवडणूका जवळ येत आहेत तसे तसे राजकीय वातावरण तापायला सुरवात होत आहे. सर्वच राजकीय पक्षांत इनकमिंग – आऊटगोइंग देखील सुरू झालं आहे. त्यामुळे ‘आमचा  एखादा जुना उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असेल. त्याला जागा लढवण्यासाठी पक्षात झालेल्या चुकांवर माफी मागून यायचं असेल तर राष्ट्रवादी त्यासाठी तयार आहे.’,असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जुन्या नेत्यांच्या ‘घरवापसी’चे संकेत दिले आहे. ते नवी मुंबईतील परिवर्तन मेळाव्यात बोलत होते.

‘निवडणुकांच्या काळात हवा कुठल्या दिशेनं वाहते हे पाहुन अनेक जण निर्णय घेत असतात. राष्ट्रवादीकडे असणाऱ्या ज्या जागा आहे, त्या ठिकाणी निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निर्णय शरद पवार घेणार आहे.’अशी माहिती अजित पवारांनी दिली. ते पुढे म्हणाले,’एखाद्या ठिकाणी आमचा उमेदवार हा सक्षम नसेल आणि त्या ठिकाणी आमचा एखादा जुना उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असेल. त्याला जागा लढवण्यासाठी पक्षात झालेल्या चुकांवर माफी मागून यायचं असेल तर पक्ष त्यासाठी तयार आहे.मात्र स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्याचा पहिला विचार केला जाईल.’असंही ते यावेळी म्हणाले.

3 Comments

Click here to post a comment