भारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे- रामदेवबाबा

पाटणा: सीमेवरील दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करायला पाहिजे, असे रोकठोक मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी बिहारच्या गया येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले रामदेवबाबा?
दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले जाते, ही बाब आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. त्यामुळे भारताने हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. दहशतवाद रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यासाठी मदतही पुरविली पाहिजे. तेव्हाच पाकिस्तान ताळ्यावर येईल, असे रामदेव बाबांनी सांगितले.