पुणे विद्यापीठ शाकाहार प्रकरण;तो वादग्रस्त पुरस्कार कायमस्वरुपी रद्द होणार ?

dr nitin kalmkar

पुणे : सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता विद्यापीठ प्रशासनाकडून शेलारमामांच्या कुटुंबियांना शाकाहाराच्या संदर्भातील अट मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु राहील अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करु अशी भूमिका अशी माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे .

शिक्षणाचे माहेर घरं असलेल्या पुण्यात पुणे विद्यापिठाने अजब फतवा जाहीर करून वाद निर्माण केलाय. कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच मिळेल, अशी अजब अट निदर्शनास आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता ,यासगळ्या वादानंतर कुलगुरू नितीन करमळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासर्व प्रकरणावर विद्यापीठाची नेमकी भूमिका काय हे सांगितले.

शेलारमामा यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक हे 2006 पासुन दिलंजात आहे. शेलारमामा पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांनी घातलेल्या आहेत.विद्यापीठाकडुन शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असुन त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे .जोपर्यंत शेलारमामांच्या कुटुंबियांकडून होकार येत नाही तोपर्यंत हे सुवर्णपदक देण्यावर स्थगिती असणार आहे. शाकाहाराची अट काढण्यास त्यांनी मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवू अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल . विद्यापीठाची भुमिका सुधारणावादी असून विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही तसेच विद्यापीठाकडुन लोकांनी दिलेल्या अशा प्रकारचे 40 पुरस्कार दिले  जातात या सर्व पुरस्कारांच्या नियम आणि अटींचा नव्याने  आढावा घेतला जाईल असे कुलगुरु नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले .