…तर आयपीएल खेळू नका, कपिल देव यांचा क्रिकेटर्सना सल्ला

नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने एक दिवसीय मालिका गमावल्यानंतर कसोटी मालिकेची सुरुवात देखील दारुण पराभवाने झाली. एक दिवसीय सामन्यांपासून इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत सुमार होत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठत आहे. टीम इंडियाची दयनीय अवस्था  पाहून माजी कर्णधार कपिल देव देखील भडकले असून त्यांनी खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.

जर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेड्यूल फार व्यग्र वाटत असेल किंवा दगदग होत असेल तर त्यांनी आयपीएल खेळू नये, असे मत कपील देव यांनी व्यक्त केले आहे. अति क्रिकेट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आयपीएल खेळू नका. आयपीएल मध्ये तुम्ही देशासाठी खेळत नसता. त्यामुळे तुमची दगदग होत असेल तर आयपीएलच्या काळात ब्रेक घेण्यास हरकत नाही. तुम्ही जेव्हा देशासाठी खेळत असता तेव्हा वेगळी भावना असते, असे कपील म्हणाले.

Loading...

आगामी काळातील टीम इंडियाचे शेड्युल कसे आहे ?

विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शनिवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. यानंतर घरच्या मैदानावर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेनंतर भारतीय संघाचे ६ खेळाडू (विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, शिखर धवन, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव) हे बांगलादेशात Asia XI vs World XI टी-२० सामन्यात सहभागी होतील. यानंतर २९ मार्चपासून लगेचच सर्व खेळाडू आयपीएलसाठी मैदानात उतरतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती