विचारधारेवर बोलाल तर याद राखा! संघ आमचा आई बाप- चंद्रकात पाटील

Chandrakant Patil

मुंबई: विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल होत. त्यामुळे त्यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्याचं निलंबन मागे घेण्याचा निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. आज सोमवारी आमदार कपिल पाटील यांनी प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्याच्या प्रस्तावाला सहमती कोणत्या विचारधारेने दिली? असा प्रश्न उपस्थित केला.

प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल होत. त्यामुळे त्यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा विरोध करत आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव कोणत्या विचार धारेतून आला असा सवाल उपस्थित करताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, विचारधारेवर बोलाल तर याद राखा, आम्ही ऐकून घेणार नाही, संघ आमचा आई बाप आहे. अशा शब्दात त्यांनी दादागिरीच सुरू केली. चंद्रकांत दादांच्या या आक्रमकपणाच्या विरोधात विरोधकही उभे राहिल्यानंतर मला शरद पवारांवर बोलायला लावू नका असा दमही त्यांनी विरोधकांना भरला.

त्यावर, चंद्रकांत दादा ही भूमिका बरी नव्हे असा सूर विरोधकांनी लगावला. त्यामुळे चंद्रकांत दादांचा  पारा आणखीच चढला. शरद पवारांवर बोलू का मी असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना दिला. या सर्व प्रकारानंतर उद्या सर्वांनी ऐकायची तयारी ठेवा मी बोलणार आहे अशा इशाराही चंद्रकांत दादा यांनी दिला. आक्रमक झालेल्या चंद्रकांतदादांची समजूत घालण्याचा प्रयत्न संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट करीत होते. पण दादांचा पारा एवढा चढला होता की ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नव्हते.