गोहत्या कराल तर असेच मराल – भाजप आमदार

bjp-mla gyan dev ahuja

टीम महाराष्ट्र देशा: गोतस्करी आणि गायींची हत्या करणाऱ्यांना अशाच प्रकारे जमावाकडून मार खाऊन जीव गमवावा लागेल, असं वक्तव्य राजस्थान मधील रामगढचे भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केलं आहे. राजस्थानातील अलवार जिल्ह्यात गोतस्करीच्या आरोपाखाली झाकिर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यावर जमावानं ट्रक अडवून त्याला मारहाण केली, असा आरोप झाकिरनं केला. त्यानंतर अहुजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गोतस्करी आणि गोहत्येच्या संशयावरून अनेकांना जमावाकडून मारहाण झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशात भाजपसह अनेक संघटनांच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्ये यामुळे सरकारवर टीका होत असते. आता या भाजप वाचाळ आमदाराच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.