आसिफाच्या वडिलांची ही ‘कैफियत’ वाचली तर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल… !

The brutal gang rape and murder of an eight-year old girl has sparked outrage and anger across India.

टीम महाराष्ट्र देशा : “जर त्यांना बदलाच घ्यायचा होता तर दुसऱ्या कोणाचाही घ्यायचा होता. ती तर एक निरागस छोटी बाळ होती. तिला स्वतःच्या हात आणि पायातील अंतर सुद्धा माहित नव्हत. त्या निरागस बालिकेला आपला डावा हात कोणता आणि उजवा हात कोणता हे सुद्धा माहित नव्हत तर हिंदू आणि मुस्लीम हे कुठून कळणार”

The brutal gang rape and murder of an eight-year old girl has sparked outrage and anger across India.

जर तुमच्यात हिम्मत असेल तरच पुढे वाचा , हे शब्द कोणा सामान्य बापाचे नाहीत हे शब्द आहेत आठ वर्षाच्या त्या निरागस बालिकेच्या बापाचे जिच्यावर बलात्कार करून मारून फेकून दिल आहे. कारण बस एवढच होत की ती एका खास धर्माची ( मुस्लीम ) आणि खास बिरादरीची ( बकरवाल ) होती. हे आम्ही नाही सांगत हे सगळ चार्जशीट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. इंडियन एक्सप्रेस ने या दुर्दैवी कुटुंबासोबत बातचीत केली आहे.

सुंदर कश्मीरच्या घाटीमध्ये थंडीचा पारा कमी झाला आहे. दरवर्षीप्रमाणे बकरवाल बिरादरीचे लोक कश्मिरी मेंढ्या डोंगरावर चरण्यासाठी घेऊन जातात. मात्र, हे वर्ष दरवर्षीप्रमाणे नाहीये. त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार झालेत. काही लोक सोडले तर संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आहे. जो कोणी ही घटना ऐकतो त्याच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही.

आसिफ़ा परिवारात सगळ्यात छोटी होती. दोन भावांमध्ये सगळ्यात छोटी एक भाऊ ११वी मध्ये शिकतोय तर दुसरा सहावी मध्ये शिकतोय. आसिफा हि त्यांची मुलगी नसून एक वर्षाची असताना तिला दत्तक घेतल होत. आसिफाला दत्तक घेतलेल्या आई-वडिलाचे दोन मुल एका अपघातात गेले होते. आसिफाच्या वडिलांनी आपल्या बहिणीची मुलगी दत्तक घेतली होती. आता तर तीही त्यांच्या जवळ नाहीये. आसिफाचा हा धक्का दोन परिवारांना आहे ज्यांनी आसिफाला जन्म दिला आणि ज्यांनी तिचा सांभाळ केला.

असिफाला जनावरांप्रती विशेष लगाव होता. घरात असणारे घोडे, मेंढ्या, कोकुरू हे आसिफाचे सगळ्यात जवळचे सवंगडी तर घरात असणारा एक कुत्रा तर आसिफाचा जिवलग त्याला जेवण भरवल्याशिवाय ही जेवण देखील करत नसे, असंं तिचे वडील सांगतात आता असिफाच्या परिवारा कडे उरल्यात फक्त तिच्या आठवणी.

त्या चिमुकलीचे वडील सांगतात मी घरातून बाहेर निघण्याचा उशीर की ही माझ्या मागे लागून बाहेर येण्याचा हट्ट धरणार त्यांना अजूनही आठवत आहे तो जानेवारीचा महिना होता नव्या वर्षाचा पहिलाच आठवडा. आसिफा आपल्या आई सोबत सांबा येथे गेली होती. घरातीलच एका पाहुण्याचं लग्न होत त्यासाठी नवीन कपडे शिवण्यासाठी. लग्न होत १४ जानेवारीला, असिफा हरवली १० जानेवारीला आणि तिचा छिन्न-विछिन्न मृतदेह सापडला १७ जानेवारीला. भारत मातेच्या या छकुलीचा मृतदेह सापडण्याआधीच टेलरने तिचे नवे कपडे शिवून दिले होते. पण छकुली तिचे हे नवे कपडे अखेर पाहू सुद्धा शकली नाही.

आसिफाची आई अश्रूंना वाट मोकळी करून देत सांगते की , “मी या उन्हाळ्यात आसिफाला एका खाजगी शाळेत टाकणार होते. आम्ही आमच्या मुलीला डॉक्टर किंवा शिक्षिका बनवायचं एवढ मोठ स्वप्न ठेवलं नव्हत कारण तो खर्च आम्ही उचलू शकत नव्हतो, आमच फक्त एवढच स्वप्न होत की थोडफार शिकली तर स्वतः पायावर उभी राहील, राहणीमान सुधारेल. दिसायला देखणी असल्याने चांगल्या घरात लग्न होऊन जाईल. आम्ही तर स्वप्नात पण विचार नव्हता केला की अशा नराधमांच्या हाताने आमच्या चिमुकलीला हरवून बसू”.

कठुआ मध्ये खूप सारे भटके राहतात ते आत्ताच नाही तर गेल्या कित्येक पिढ्यांपासून ते येथे राहतात. त्यांच्या कोणासोबत अस कधीच काही झाल नाही. आम्ही आमच्या शेजारील हिंदूंसोबत भाऊ-बहिण सारख राहतो. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतो. एकमेकांच्या सणांत , लग्न- कार्यात सहभागी होतो, मात्र मागील काही वर्षापासून हे सगळ बदललं कस ते आसिफाचे वडील सांगतात.

ते लोक ( आसिफाचे मारेकरी ) बाकी लोकांना आमच्या विरुद्ध भडकवतात. आमच्या विरुद्ध खोटे आरोप लावतात. ते म्हणतात आम्ही जम्मू मध्ये गायी खरेदी करून काश्मीर मध्ये विकतो, आम्ही अमली पदार्थ विकतो, आमचे जनावरे त्यांची पिके नष्ट करतात. आमचे घर मोहल्ले हिंदूंसाठी धोकेदायक असल्याचे सांगून फक्त मनात विष कालवायच काम ते करत असतात. पण आमच्या मनात अस काहीच नाही कोणताच तिरस्कार नाही. ‘बकरवाल’ ला माहित होत की ते लोक आम्हाला पसंद करत नाहीत पण त्याचा परिणाम इतका भयानक असेल असा कधीच विचार सुद्धा नव्हता केला. असिफाचे वडील डोळे पुसत ही सगळी कहाणी सांगत होते.

आसिफाचे वडील पुढे सांगतात ते लोक ( सांजी राम आणि त्याचे साथीदार जे या प्रकरणात आरोपी आहेत ) आम्हाला गावाच्या रस्त्यांवरून जाऊ देत नाही. आमच्या मेंढ्या, जनावरे चरायला इकडे तिकडे गेली तर पकडून जप्त करतात. मला वाटल सांजी राम त्यामुळे नाराज असेल हाणमार करेल, FIR करेल किंवा भरपाई मागेल. मी नव्हता विचार केला की एवढी नीच हरकत हा पापी माणूस करेल.

आसिफा बेपत्ता झाल्यवर तिच्या परिवाराने तिला सगळीकडे शोधल तेव्हा त्यांना कणभर देखील संशय नव्हता की त्यांची मुलगी मंदिरामध्ये असेल. तिथ शोधण्याचा विचार सुद्धा नव्हता.

पोलीसवाला,म्हणजे दीपक खजुरिया जो या सगळ्यातील आरोपी आहे. हा मंदिराबाहेर उभा असायचा आम्ही तर विचारच नव्हता केला की मंदिरामध्ये आसिफाचा शोध घ्यावा कारण आम्हाला माहित आहे की मंदिर ही खूप पवित्र जागा आहे.

शेवटी आसिफाचे वडील डोळे पुसत जे बोलले ते त्या लोकांनी नक्की वाचा जे या माणूस रुपी राक्षसांच्या बचावासाठी देशाचा पवित्र तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. हे वाक्य त्यांना उकळून पाजावे जेणेकरून थोडी तरी माणुसकी त्यांच्या मध्ये येऊ शकेल.

“जर कोणत्याही हिंदू मुलीसोबत असं झालं असत तर तिच्या न्यायासाठी आम्ही सर्वात आधी रस्त्यावर उतरलो असतो. माणुसकी सर्वात आधी नंतर तुम्ही हिंदू किंवा मुस्लीम”. असिफाच्या वडिलाचे हे वाक्य सगळ काही सांगून गेले.

1 Comment

Click here to post a comment
Loading...