Rohit Pawar | पुणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचं विधान करू नये. तसं विधान केल्यास माफी मगितली पाहिजे”, असा सल्ला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही,असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांना सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mohammad Rizwan | “टीम इंडियाला हरवल्यानंतर आम्हाला सगळं…”; मोहम्मद रिझवानने केले वक्तव्य
- Sachin Sawant | “भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?” ; सचिन सावंत असं का म्हणाले?
- Ajit Pawar | “सत्ताधारी लोकांच्या सुरू असलेल्या चौकशींना क्लीनचीट आणि…” ; अजित पवारांना शंका
- Sanjay Raut | महाविकास आघाडीच्या मोर्चावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Amit Shah | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया