‘हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा!’, राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

नंदूरबार : महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेसाठी एक नवीन मुद्दा आलाय. कोरोना, लॉकडाऊन, महागाई, इत्यादी महत्त्वाचे विषय बाजुला ठेऊन राज्यातील दोन महत्त्वाच्या पक्षाचे दोन मोठे नेते वाघाच्या मैत्रीच्या मुद्द्यावरून एकमेकांना टोले लगावत आहेत. विशेष म्हणजे यातून काहीही निष्पन्न होत नसून केवळ मनोरंजन सुरू असल्याचे दिसेतेय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेला हा निष्कारण वाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी धुमसता ठेवला आहे.

‘शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

संजय राऊत आज नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली. ‘चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खालला असेल. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, आम्ही पिंजऱ्यात बसलो आहोत. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला असून त्यांना मी पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. त्यांनी पिंजऱ्यात येवून दाखवावे व हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावुन दाखवा.’ असे राऊत म्हणाले.

‘त्या’ भेटीला वेगळे वळण दिले
मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु या संदर्भात आता राज्याची भुमिका राहिली नाही; हा मुद्दा सोडविण्यासाठी आता जे काही करायचे आहे, ते केंद्रालाच करावे लागणार आहे. हाच प्रमुख मुद्दा मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांची भेट घेतली. परंतु या भेटीला वेगळे वळण दिले जात आहे असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP