fbpx

हिंमत असेल तर बारामतीत EVM घोटाळा करून दाखवा : अजित पवार

ajit pawar

पुणे : EVM घोटाळ्यावर माझा विश्वास नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर बारामतीत घोटाळा करून दाखवा, असं थेट आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही यांचीच सत्ता असताना शहरातील प्रश्न प्रलंबित कसे? असा सवाल करत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

59 मिनिटांत 1 कोटींचं कर्ज हाही चुनावी जुमलाच आहे. आता म्हणतायत पण ते प्रत्यक्षात शक्य नाही. निवडणुका झाल्या की तेही म्हणतील जुमलाच होता, असा घणाघात अजित पवार यांनी केला आहे. शुक्रवारी पंतप्रधानांनी 59 मिनिटांत 1 कोटी कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा केली, त्यावर अजित पवार यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत ‘रोकठोक’ उत्तर देणारे रोहित पवार कोण आहेत?

माढ्याचं तिकीट मलाच मिळायला हवं!,राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा हट्ट

भाजपला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही : जयंत पाटील