मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिले आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
“जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे २२ लोक फुटले. राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. कितीही असू द्या. ५४ असू द्या. राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. अशा शब्दांत राऊतांनी बंडखोर आमदारांच्या गटाला आव्हान आहे.
दरम्यान “तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना?”, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<