हिंमत असेल तर, भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे द्या!- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई: हिंमत असेल तर, भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे द्या! असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले. या अधिवेशनावर सत्तारूढ पक्षाचाच दबदबा राहिला. विरोधकांकडे टीका करण्यासाठी एकही मुद्दा नव्हता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आमने-सामने आले. दरम्यान, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘निलगेंकरांनी कोणत्याही बँकेकडुन कर्ज घेतले नव्हते. ते जामीनदार असलेल्या कर्जाला बँकेने वनटाईमसेटलमेंट दिली आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.