टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये सर्वत्र थंडीची (Cold) चाहूल लागली आहे. त्यामुळे हिवाळा (Winter) येतच आपल्याला त्वचेच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो आणि शरीराच्या इतर भागांबरोबर पायाच्या टाचांमध्ये भेगा पडायला लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही पार्लरमध्ये जाऊन अनेक उपाय करत असतात. पण भेगा पडलेल्या टाचांसाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा पेडिक्युअर करू शकत नाही. कारण त्यामुळे तुमच्या पायांच्या टाचांना आणि हानी पोहचू शकते. त्यामुळे तुम्ही भेगा पडलेल्या टाचांवर घरगुती उपाय करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून पायाच्या टाचांच्या भेगा कशा भरून काढायच्या याबद्दल माहिती सांगणार आहोत.
हिवाळ्यामध्ये Winter पायाच्या टाचांचा समस्या निर्माण होत असेल तर पुढील उपाय करा
पायांच्या टाचांना फुट मास्क लावा
हिवाळ्यात पडलेल्या पायांच्या भेगांमध्ये मध्ये तुम्ही फुट मास्क लावून त्या भरू शकतात. फुट मास्क तयार करण्यासाठी तुम्ही मीठ, ग्लिसरीन आणि गुलाब जलचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ, ग्लिसरीन आणि गुलाब जल टाकून त्याला मिक्स करून घ्यावे लागेल. नंतर या मिश्रणामध्ये तुम्ही तुमचे पाय वीस मिनिटांसाठी भिजवून ठेवा. आणि नंतर फूट स्क्रबरने ते स्वच्छ करा. पायांच्या टाचा स्वच्छ झाल्यावर रात्रभर पायामध्ये मोजे घालून झोपा. हे असे नियमित केल्याने तुमच्या पायाच्या फाटलेल्या टाचा लवकरच बरे होऊ लागतील.
मध
पायाच्या फाटलेल्या टाचा भरण्यासाठी मध रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक कप मध घ्यावे लागेल. एक बादली गरम पाण्यामध्ये हे मध टाकून त्या बादलीमध्ये वीस मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्यानंतर तुमचे पाय प्युमिस स्टोन ने स्वच्छ करा आणि त्यावर क्रीम लावा. हे असे नियमित केल्याने तुम्हाला हिवाळ्यामध्ये पायांच्या टाचांची समस्या निर्माण होणार नाही.
तांदळाचे पीठ
हिवाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या टाचांच्या भेगांच्या समस्येसाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकतो. यासाठी तुम्हाला चार चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये थेंबभर ॲपल साइडर विनेगर टाकावे लागेल. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध मिक्स करून त्याची घट्ट पेस्ट करून घ्या. जर तुमच्या पायाच्या टाचा जास्त फाटल्या असतील तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा तेल सुद्धा घालू शकता. हे मिश्रण लावण्यासाठी तुमचे पाय दहा मिनिटे कोमट पाण्यात भिजवून घ्या. पाय व्यवस्थित भिजल्यावर त्यावर ही पेस्ट लावून स्क्रब करा. हे स्क्रब नियमितपणे केल्याने तुमच्या पायाची त्वचा मुलायम होऊ लागेल.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- T-20 World Cup । विराट कोहलीच्या ‘त्या’ सल्ल्याने मी अर्धशतक पूर्ण करू शकलो; सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा
- Bike Update | 1 लाखापेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ बाईक
- IND vs SA । रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
- Face Care Tips | चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर वापरा ‘हे’ घरगुती फेसपॅक
- T-20 World Cup । दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत विराट कोहली करणार मोठा विक्रम!