मस्ती आली असेल तर नानार प्रकल्प रेटून दाखवाच! उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा

मुंबई: शिवसेना आणि भाजप नानार प्रकल्पावरून पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल नानार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय कुठल्याही मंत्र्याला नसल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. तसेच ठाकरे यांनी ‘मस्ती आली असेल तर नानार प्रकल्प रेटून दाखवाच!’ असा फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

दरम्यान, अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार देसाई यांना नसल्याचा खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची गोची केली. नाणार प्रकल्पवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीएम फडवणीस यांच्यावर ही जोरदार टीका केलीय.

You might also like
Comments
Loading...