मुंबई: आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी बाळसाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसैनिकांना आज शिवसेना भवनावर जमण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे कळते आहे. दरम्यान सेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे पाच ठराव-
बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी मध्ये पडणार नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचा पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, केली इतकी कमाई
- Atul Bhatkhalkar : “ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी…”, फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यानंतर भातखळकरांचा राऊतांना टोला
- Shivsena : राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण; शिवसैनिक आक्रमक
- Chitra wagh : “सर्वज्ञानी संपादकांनी या झमेल्यात पडू नये, कर्माची फळे…” ; चित्रा वाघ यांचा राऊतांना सल्ला
- Salman Khan : ‘या’ मराठी चित्रपटामध्ये दिसणार बॉलिवूडचा भाईजान सलमान खान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<