Share

Delhi Tour Guide | देशाची राजधानी दिल्ली फिरायला गेला तर ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहरांमध्ये प्रामुख्याने भारताची राजधानी दिल्ली चा Delhi समावेश होतो. दिल्लीमध्ये इतिहास दडून बसलेली अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी बरोबर इतर पर्यटकांचा कल दिल्लीकडे वाढत चालला आहे. दिल्लीमध्ये अनेक आकर्षक पर्यटन स्थळे आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य ठिकाणं जुन्या दिल्ली मध्ये आहे. जर तुम्ही दिल्लीला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दिल्लीमध्ये कोणती कोणती पर्यटन स्थळे आहे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

राजधानी दिल्ली Delhi मधील पर्यटन स्थळे

लोधी गार्डन

देशातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीची ओळख आहे. पण दिल्लीमध्ये अनेक नैसर्गिक ठिकाणी देखील आहे. यामध्ये लोधी गार्डन चा समावेश होतो. दिल्लीच्या प्रदूषणाचा आणि सीमेंट जंगलाचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही लोधी गार्डन या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन ताजी हवा घेऊ शकता. हे गार्डन शहराच्या मध्यभागी वसलेले असून खूप सुंदर आणि आकर्षक जागा आहे. येथील कारंजे या गार्डनमधील मुख्य आकर्षण आहे.

खान मार्केट

दिल्ली आणि दिल्लीतील मार्केटची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. कारण दिल्लीमधील मार्केटमध्ये कमीत कमी किमतीत तुम्हाला गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे तुम्ही दिल्लीला खरेदी करायला जायचा प्लान करत असाल तर तुम्ही लोधी गार्डन पासून थोड्या अंतरावर असलेल्या खान मार्केटमध्ये जाऊ शकता. खान मार्केटमध्ये तुम्हाला दागिने, कपडे, पुस्तके इत्यादी गोष्टी अगदी स्वस्थ दरात उपलब्ध होतील. खरेदी सोबत खान मार्केटमध्ये चांगले रेस्टॉरंट देखील आहे. प्रामुख्याने येथील कॅरेट केक सुप्रसिद्ध आहेत.

चांदणी चौक

दिल्लीतील चांदणी चौक हा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर चांदनी चौकात मिळणारे स्ट्रीट फूड देखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. चांदणी चौक मध्ये असलेले खाद्यपदार्थांची स्टॉल वर्षानुवर्ष जुने आहे त्यामुळे तेथील पदार्थांना भारताच्या संस्कृतीची. चांदणी चौकातीळ जिलेबी आणि छोले भटूरे पर्यटकांना आकर्षित करतात.

बंगला साहेब गुरुद्वारा

दिल्ली शहरातील बंगला साहेब गुरुद्वारा हे एक अत्यंत सुंदर ठिकाण असून पर्यटकांना भेट देण्यासाठी एक उत्तम जागा आहे. हा गुरुद्वारा संस्कृती, दयाळूपणा आणि उदारतेचे प्रतीक आहे. कारण या गुरुद्वारामध्ये हजारो लोकांना जेवू घातले जाते. तुम्ही जर दिल्लीमधील बंगला साहेब गुरुद्वाराला भेट देण्यास गेल्या तर तेथील स्वयंपाक घरास नक्की भेट द्या. आणि तुम्हाला जमल्यास तिथे सेवा देखील करा.

अक्षरधाम मंदिर

दिल्लीमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी अक्षरधाम मंदिर हे एक सुंदर ठिकाण आहे. हे मंदिर 2005 साली बांधले गेलेले आहे. अक्षरधाम ही वास्तू आणि मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी असून येथे फोटो काढण्यास परवानगी नाही. या मंदिराच्या आवारात संध्याकाळी 3D लाईट शो बघण्यासारखा असतो.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहरांमध्ये प्रामुख्याने भारताची राजधानी दिल्ली चा Delhi समावेश होतो. दिल्लीमध्ये …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now