वैज्ञानिक उपकरणे मिळाल्यास जिल्हा प्रशासनास कळवावे

सोलापूर : सायंटिस्टइनचार्ज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेमार्फत अणुऊर्जा विभाग भारतीय अवकाश संशोधन विभागाच्या सहकार्याने ३० ऑगस्टपर्यंत हैदराबाद येथून १० बलून फ्लाइट अवकाशात सोडण्यात येणार आहेत. हे बलून फ्लाइटमध्ये संशोधनासाठी आवश्यक वैज्ञानिक उपकरणांचा समावेश आहे. हे बलून फ्लाइट १७ ते ३० किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर त्यातील वैज्ञानिक उपकरणे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सोडण्यात येणार आहेत. पॅराशूटच्या सहाय्याने ते ३० ऑगस्ट या कालावधीत सोडण्यात येणारी उपकरणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडण्याची शक्यता आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या उपकरणाची माहिती त्वरित जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासनास द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...