SBI कडून ‘हा’ मेसेज आल्यास वेळीच सावध व्हा! अन्यथा…

मुंबई :  सध्या लोकांमध्ये डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  कोरोनाच्या काळापासून अनेक लोक अधिक करून डिजिटल बँकिंगचा वापर करताना दिसत आहेत. मात्र याचा वापर करत असताना फसवणुकीचे प्रकार देखील अधिक घडतात. SBI कडून तुमचे YONO खाते बंद झाल्याचा मेसेज अनेकांना येत असल्यास वेळीच सावध व्हा. कारण हा मेसेज खोटा असल्याचे पीआयबी  फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे.

याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करत म्हटले की, एक बनावट मेसेज समोर येत असू तो एसबीआयचा असल्याचा दावा केला जात आहे. आपले योनो खाते बंद केले गेले आहे, असा दावा करत आहे. तसेच, पीआयबीने त्याच्या ट्विटर हँडलवर मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या मेसेजमध्ये योनो खाते बंद केले गेले आहे. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट करून नेट बँकिंगमध्ये लॉगिन करण्यास सांगितले जाते. त्यात एक लिंकही शेअर करण्यात आली आहे, ज्यावर युजरला क्लिक करावे लागेल.

परंतु,  ही लिंक पूर्णपणे खोटी असल्याने त्यावर अजिबात क्लिक करू नका आणि तुमची कोणतीही बँकिंग किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नका. सायबर गुन्हेगारांसाठी तुम्हाला फसवणुकीचा बळी बनवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. त्यामुळे त्यात तुम्ही अजिबात पडू नका, सावध राहा.

महत्वाच्या बातम्या